पद्माई नर्सिंग कॉलेज
ABOUT US | आमच्याविषयी
राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित
मावसाळा, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर
|
पद्माई नर्सिंग कॉलेज
पद्माई नर्सिंग कॉलेज, मावसाळा, ता. खुलताबाद,
जि. छत्रपती संभाजीनगर हे
राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या
वीस वर्षांपासून शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात
सातत्याने कार्यरत आहे.
संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना विविध
व्यावसायिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही संस्थेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून
योगदान दिले आहे.
|
संस्थेचा इतिहास व वाटचाल
संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे,
नेत्र तपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच
आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आले आहेत.
कोविड-१९ महामारीच्या काळात संस्थेने गरजू रुग्णांना व नागरिकांना
आवश्यक ती मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.
तसेच क्षयरोग निदान व जनजागृती या क्षेत्रातही संस्थेने कार्य केले आहे.
डिजिटल एक्स-रेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा व निदान सुविधा
पोहोचविण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.
|
पद्माई नर्सिंग कॉलेजची स्थापना
या विविध आरोग्यविषयक उपक्रमांमधून संस्थेला असे प्रकर्षाने जाणवले की,
ग्रामीण भागातील मुलींना नर्सिंगचे दर्जेदार व व्यावसायिक शिक्षण
आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास त्या स्वतःच्या पायावर उभ्या
राहण्यास सक्षम होतील.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यविषयक जनजागृती व
प्राथमिक सेवा पोहोचविण्यात नर्सिंग क्षेत्रातील प्रशिक्षित
मनुष्यबळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
या सामाजिक व शैक्षणिक उद्देशाने प्रेरित होऊन
राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये
मावसाळा, ता. खुलताबाद येथे पद्माई नर्सिंग कॉलेजची स्थापना केली.
|
१००+
विद्यार्थिनी नर्सिंग शिक्षण व प्रशिक्षण घेत आहेत
विद्यार्थिनींना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक व
समाजाभिमुख आरोग्यसेवेचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.
|
🎯 Mission — संस्थेचे ध्येय
- ग्रामीण व वंचित घटकांतील मुलींना दर्जेदार नर्सिंग शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
- विद्यार्थिनींमध्ये व्यावसायिक कौशल्य, सेवाभाव, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे.
- सक्षम, कुशल आणि संवेदनशील नर्सिंग मनुष्यबळ तयार करणे.
- आधुनिक आरोग्यसेवा व तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थिनींना सक्षम करणे.
- मुलींना उच्च शिक्षण, रोजगार व स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
|
👁 Vision — संस्थेची दूरदृष्टी
“ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीला गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाची
संधी देऊन तिला सक्षम, स्वावलंबी व सेवाभावी आरोग्यसेविका बनविणे
आणि तिच्या माध्यमातून ग्रामीण समाजाच्या आरोग्यविषयक विकासाला
चालना देणे.”
पद्माई नर्सिंग कॉलेजचे दीर्घकालीन उद्दिष्ट ग्रामीण भागात
गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होणे,
अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि
प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाच्या माध्यमातून
“सुदृढ, सक्षम आणि आरोग्यदायी ग्रामीण समाज”
निर्माण करण्यासाठी योगदान देणे हे आहे.
|
|